माय मराठी

 

माय मराठी

 

 

वास्त्यल्याचा ठेवा, जरा जपूनी ठेवा... 

माझ्या मराठीचा गर्व, अभिमानाने फुलवा... 

धन्य माझी माय माऊली, जिने मला पोसिले... 

गौरव माझ्या मराठीचा, साऱ्या महाराष्ट्राने जाणिले... 

मानतो माय माऊली, अशी माझ्या मराठीची बोली... 

रसभरी, मधुभरी वाणी, माझी माय मराठी गायली... 

सदैव राहील प्रेम आमुचे, माझींया माऊलीवरती... 

सर्वोच्च शिखर गाठील, माझी माय मराठी एकेदिवशी... 

गौरवाने गातो गीत माझ्या मराठीचे... 

मधूर वाणी लाभली आम्हांस भाग्य माझ्या मानव जातीचे... 

जन्मापासूनी नाळ जोडली, माझी माझ्या या मातीशी... 

घेऊन जाईल तुझं शिखरावर आज देतो मी वचन तुला... 

तुझ्याचं गर्भात रचिला मी माझ्या आयुष्याचा ठेवा... 

माझ्या मराठीचा गर्व, अभिमानाने फुलवा... 

माझ्या मराठीचा वारसा देतो तान्हुल्या भातुकलीच्या हाता... 

जोपासा माझ्या माऊलीला जिने गौरविल्या, घडविल्या लाख लाख पिढ्या... 

ज्या कुशीत विसावला साऱ्या मानवतेचा ठेवा... 

वास्त्यल्याचा ठेवा, जरा जपूनी ठेवा... 

माझ्या मराठीचा गर्व, अभिमानाने फुलवा... 

माझ्या मराठीचा गर्व, अभिमानाने फुलवा, अभिमानाने फुलवा.... 

 

- कोमल जगताप